फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नसल्याने सांगवीत आंदोलन!

महापालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नसल्याने सांगवीत आंदोलन!

शिक्षण सेवेचे वाजले तीन तेरा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. मात्र, महापालिका शाळांचा गुणवत्तेचे, शिक्षण सेवेचे तेरा वाजले आहेत. महापालिकेच्या ५० शाळेमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. म्हणून सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि १ ) मनसेने आंदोलन केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी -चिंचवड महापालिकेची सांगवीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा आहे. तिथे तीन महिने मुख्याध्यापकच नाहीत, त्यामुळे अडचणी येत आहेत. पालकाच्या तक्रारी, मुलाच्या अडचणी, शिक्षकांच्या समस्या कोणाकडे सांगायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत नागरिक तक्रार करीत आहेत.

क्रिडा, शिक्षक, कला शिक्षकही नाहीत
महापालिकेच्या सर्व शाळेत पाहणी केली आहे. एकूण ११० शाळा आहेत, त्यात जवळपास ५० शाळांना मुख्याध्यापकच नाहीत. क्रिडा, शिक्षक, कला शिक्षकही नाहीत, असा शिक्षण विभाग प्रशासनाचा कारभार आहे. महापालिका शाळेत पट संख्या नाही. याचे प्रमुख कारण तिथे मुख्याध्यापक नाहीत. या सांगवी शाळेत १ ली ते ७ वी हजेरी पटसंख्या जवळपास ३०० च्या पुढे आहे. शाळेत आज मनसेचे कार्यकर्ते गेले त्यांनी मुख्याध्यापक यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. आंदोलन केले यावेळी उपाध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेकर, उपविभाग अध्यक्ष अलेक्सझाडर मोजेस, शाखा अध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष राजू सावळे म्हणाले, ‘महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना म्हणून लवकरात सर्वच शाळांना मुख्याध्यापक नेमावेत, अन्यथा महापालिका आयुक्त दालनात व शिक्षक मंडळ कार्यालयात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.’

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"