फक्त मुद्द्याचं!

27th June 2025
पिंपरी-चिंचवड

पवना धरण 50 टक्के भरले!

पवना धरण 50 टक्के भरले!

पिंपरी : पिंपरी पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवनाधरण 50.78% भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे .यंदा मे महिन्यात प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले लवकर प्रवाही झाले.त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून 664 मि.मि. पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. मावळ परिसरातील वडिवळे धरणाच्या सांडव्यामधून पवना नदीमध्ये पाणी सोडले जात आहे.

viarasmall
viarasmall

कासारसाई धरणाच्या सांडव्यातून २०४० क्यूसेक्स विसर्ग
कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात १३६० क्यूसेक्सने सुरु असणारा विसर्ग वाढवून २०४० क्यूसेक्सने करण्यात येत आहे. पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, दि.म.डुबल यांनी पत्राद्वारे दिली आहे.

तरी सर्वांना विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन डुबल यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"