फक्त मुद्द्याचं!

28th June 2025
अध्यात्म

पालखी सोहळा पत्रकार संघातर्फे सुनील लांडगे यांचा सन्मान!

पालखी सोहळा पत्रकार संघातर्फे सुनील लांडगे यांचा सन्मान!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि तुकोबारायांचे सेवक, महाराष्ट्र टाइम्सचे विभाग प्रमुख सुनील भाऊ लांडगे यांना आषाढी वारीच्या वार्तांकनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय वारकरी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समवेत सकाळचे मुख्य उपसंपादक शंकरराव टेमगिरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि बखर लाईव्ह या प्रसिद्ध चॅनलचे मुख्य संपादक उमेशराव धोंगडे आदी उपस्थित होते.

वारकरी भूषण म्हणून गौरव
आषाढीवारीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील मानाचा पुरस्कार सुनील लांडगे यांना प्रदान केला जाणार आहे. सकाळ महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून लांडगे यांनी आषाढी वारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज बीज सोहळा अशा विविध सोहळ्यात सहभागी होऊन वृत्तांकन केले आहे. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ तुकोबारायांचे उपरणे देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे म्हणाले, ‘ ज्येष्ठ पत्रकार आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे यांनी गेली तीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे. पत्रकारांचे ते भूषण आहेत. देहू आळंदी या तीर्थक्षेत्रांचा विकास त्याचबरोबर आषाढी वारी मध्ये सहभागी होऊन भावस्पर्शी लेखन केले आहे. त्यामुळे वारी सोहळा वैश्विक पातळीवर पोहोचण्यासाठी मदत झाली. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी वारीचा सोहळा सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पंढरपूर येथे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. ‘

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"