नव्याने शस्त्र परवाने देणे पुणे पोलिसांनी थांबवले!

तब्बल 404 अर्ज नाकारण्यात आले
पुणे शस्त्र परवाना प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरता आणत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ शस्त्र परवान्याची तपासणी मोहीम सुरू केली आहे .या कारवाईत एक जानेवारी 2024 ते 3 जून 2025 या कालावधीत दाखल झालेल्या 572 अर्जांपैकी केवळ 28 अर्जांना मंजुरी देण्यात आली. तब्बल 404 अर्ज नाकारण्यात आले आहेत .
याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत .शस्त्र परवानेचे नूतनीकरण न केल्यामुळे आणखी 97 परवाने रद्द करण्यात आले आहेत ..एकूण 140 शस्त्र परवाने रद्द किंवा रद्दबातल करण्यात आले आहेत. याशिवाय काही अर्जदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आले आहेत .निलेश चव्हाण याने 2022 मध्ये पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र पुणे पोलीस आयुक्तालयाकडून तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अपील केले होते. अशी माहिती समोर आली आहे

.पुणे पोलिसांनी अहवाल सादर केला त्यानुसार निलेश चव्हाण ला 2019 मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दाखल हाणामारीचा अदखलपात्र गुन्हा 2019 मधील हिंजवडी पोलीस ठाण्यातील होता. अदखलपात्र गुन्हा आणि वारजे पोलीस ठाण्यात मे 2022 मध्ये दाखल पत्नीच्या छळवणुकीचा गुन्हा याची माहिती दडवण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला .त्यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त तर जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते .शस्त्र परवाने देणे पुणे पोलिसांनी थांबवले असून.पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले.
पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना देताना त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असा अहवाल पुणे पोलिसांनी दिल्याचे समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट शस्त्र परवाना देण्याला ब्रेक लावला आहे .पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले असून 140 अर्ज थेट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे नव्याने शस्त्र परवाना देणे पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवले आहे