मराठा समाजातील बांधवांची सहविचार सभा !

लग्नकार्य,इतर विधी अनुषंगाने विचार विनिमय
पिंपरी : मराठा समाजामध्ये लग्नविधी व इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक खर्चिक रूढी परंपरा नव्याने अस्तित्वात येत आहेत. या सर्वसामान्य नागरिकांना आणि मराठा समाजासाठी घातक ठरत आहेत याची उदाहरणे दैनंदिन बातम्यांमधून आणि वर्तमानपत्रातून पहावयास मिळतात, या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील समाज बंधू भगिनी व विचारवंत यांची एक सहविचार सभा शनिवार दिनांक ३१ जून २०२५ रोजी सायं. ६:०० वाजता तारांगण सभागृह, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.

या अनुषंगाने या पूर्वी समाजाचे किंवा वैयक्तिक झालेल्या चुकांपेक्षा यापुढे त्यामध्ये काय सुधारणा करणे शक्य आहे याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यासाठी प्रवीण तुपे, शांताराम गराडे, डॉ. गौरी चिंचवडे भोसकर, अविनाश काशिनाथ काटे, विठ्ठल वाळुंज, सुनील पोटे इत्यादींनी पुढाकार घेतला आहे.

