टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार : एक गंभीर जखमी!

पिंपरी : फर्निचर दुकानातील साहित्य आणण्यासाठी जात असलेल्या दुचाकीला टँकरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. २१) दुपारी अडीचच्या सुमारास मारुंजी गाव येथील आल्हाट कॉलेजजवळ घडला.

अनस खान (वय २६, रा. नेरे-दत्तवाडी, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. नसीम अन्वर अन्सारी (वय ४५) हे जखमी झाले आहेत. अन्सारी शहाबाद हयात (वय २७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टँकरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अन्सारी यांचे नेरे दत्तवाडी येथे सोफा गोदाम आहे. त्यामध्ये नसीम अन्सारी आणि अनस खान हे काम करत होते. ते दोघेजण फिर्यादी यांची दुचाकी घेऊन दुकानाचे साहित्य आणण्यासाठी वाकड येथे जात होते. मारुंजी गावातील आल्हाट कॉलेजजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक दिली. या अपघातात नसीम अन्सारी हे जखमी झाले. तर अनस खान याचा मृत्यू झाला.