फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार : प्रशासक शेखर सिंह

शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार : प्रशासक शेखर सिंह

पिंपरी : पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरविण्यासाठी बुधवारी झालेल्या चर्चासत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी,माजी पदाधिकारी, माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी सहभागी होत विविध विषयांवर आज सविस्तर चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत असून या अनुषंगाने दळणवळण आराखडा तयार करण्यात यावा, दळणवळण आराखडा तयार करताना पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार केला जावा, असे मतही लोकप्रतिनिधींनी मांडले.

महामेट्रोच्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वतीने आयोजित चर्चा सत्र ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, राजू दुर्गे, मारूती भापकर,सचिन चिखले, अभिषेक बारणे, शर्मिला बाबर,सुवर्णा बुर्डे, सुनिल कदम, संतोष मोरे,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, महामेट्रोचेसंचालक अतुल गाडगीळ, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अमोल मुदळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तेजस चव्हाण, ऋषभखरात आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात भविष्यातील होणारे मेट्रो मार्ग , बीआरटी, बस थांबे,वाहनतळ, पूल तसेच शहरात सुरु असलेल्या दळणवळण संबंधित प्रकल्पांबाबत चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम व्हावी,शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

viara ad
viara ad

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप
पुणे मेट्रोचे नाव बदण्याची मागणी शहरातील नागरिक पूर्वीपासून करत असल्याची आठवणकरून दिली व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुणे मेट्रोचे नाव बदलण्याची मागणी केली.संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची पुणे मेट्रोचे नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो करावी अशीच मागणी आहे. तसेच मेट्रो खांबावर वारकरी थीमवर आधारित चित्र रेखाटणी करण्यात यावी, पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वेचे जंक्शन करण्यात यावेअसे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहरतील नेहरू नगर बस स्थानक येथून महाराष्ट्रभर जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महा मेट्रोने येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही येथील दुरुस्ती झाली नसून फक्त रंगरंगोटी केल्याचे दिसून येत आहे. येथील काम लवकर पूर्ण करावीत. – उमा खापरे, आमदार

शहराच्या विकास हा दळणवळणवर अवलंबून असतो म्हणून शहराचा दळणवळण विकास आराखडा ठरवताना शहरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुतीवर भार देणे आवश्यक आहे. बस, मेट्रो, रेल्वे व रस्ते सर्वांचा विकास आवश्यक आहे. अमित गोरखे, आमदार

पिंपरी चिंचवड शहरात भविष्यातील होणारे मेट्रो मार्ग , बीआरटी, बस थांबे, वाहनतळ, पूल तसेच शहरात सुरु असलेल्या दळणवळण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकाप्रयत्नशील आहे. पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरवताना आज लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन पुढील दळणवळणआराखडा ठरविला जाणार आहे. – शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"