फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

दापोडीत चालत्या कारला आग!

दापोडीत चालत्या कारला आग!

दापोडी : रस्त्यावरून जात असताना अचानक चालत्या कारला आग लागली या आगीत ही कार जळून खाक झाली .सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मुंबई पुणे रस्त्यावरील अशोका हॉटेल समोर ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक गौरव प्रकाश बोरा हे गाडी चालवत होते. दापोडी चौकात अचानक इंजिन भागातून धूर येऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. कार रस्त्याच्या कडेला घेत असताना गाडीने पेट घेतला. गौरव बोरा यांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले रस्त्याच्या मध्यभागीच कारला आग लागल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही, दापोडी पोलीस याबाबत तपास करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"