फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!

स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!

‘‘विकसित भारत अभियान’’ चे शहरभरात ‘बॅनरबाजी’
पिंपरी : ‘‘विकसित भारत अभियान’’ चा नारा देत देशभरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस विविध उपक्रम आणि विधायक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा वज्रमूठ दाखवली आणि शहरभरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण शहरात पक्षाचे फ्लेक्स लावण्यात आले असून, शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भाजपासह तमाम हिंदू बांधवांचे आराध्य प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थात राम नवमी आणि भाजपा स्थापना दिवस एकत्र येण्याचा योग आला. त्यामुळे एका बाजुला श्रीराम यांचा जयघोष आणि दुसऱ्या बाजुला ‘‘अजेय भारत… अजेय भाजपा..’’ असा संकल्प शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा दिसला आहे.

भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे स्थापना दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, माऊली थोरात, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत शहरात फ्लेक्सद्वारे विकसित भारत आणि महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी झाल्याबाबत जनजागृती केली. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे फोटो झळकले आहेत. आमदार लांडगे यांच्या निवासस्थानी त्यांनी सकाळी ध्वजारोहण केले. त्यानंतर भोसरी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयावर ध्वज फडकावण्यात आला. आगामी निवडणुकांच्या निमित्ताने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी एकजुट केल्याचे पहायला मिळत आहे.

viara ad
viara ad

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा मजबूत
पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची वाटचाल 2014 पासून सक्षम होवू लागली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळीचा सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट भाजपासोबत गेला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आणि मोठा गट भाजपात दाखल झाला. परिणामी, 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर ‘‘कमळ’’ फुलले. भाजपाच्या सत्ताकाळात शहरातील अनेक मान्यवरांना मोठी संधी मिळाली. त्यामध्ये सदाशीव खाडे, ॲड. सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उमा खापरे, अनुप मोरे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा बलाढ्य असून, त्या ताकडीने पक्ष संघटना मजबूत होत आहे.

“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा भाजपा विचार अंगिकारत, अंत्योदयाच्या मार्गावर भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता अविरत वाटचाल करत आहे. भाजपा स्थापना दिनानिमित्त निवासस्थानी, प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयसमोर आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकावून हा गौरवाचा दिवस साजरा केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे संघटन मजबूत करीत असून, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि विकसित भारत व शेवटच्या घटकाचा विकास साधणे, असा संकल्प आहे.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"