फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
अध्यात्म

भगवान श्रीराम भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ : देवेंद्र फडणवीस

भगवान श्रीराम भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ : देवेंद्र फडणवीस

पुण्यात “राम-सीता स्वयंवर” आणि “सखी गीतरामायण” चा भव्य सोहळा
पुणे : राम नवमीच्या पूर्वसंध्येला “सखी गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर” या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे अत्यंत भक्ती-भावात पार पडले. या आध्यात्मिक कार्यक्रमात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला आणि भक्तीमय अनुभवाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले

या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, आमदार भीमराव तापकीर यांच्या सोबत अनेक मान्यवर व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांनीही सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले, की भगवान श्रीराम हे केवळ धर्म आणि मर्यादेचे प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ आहेत. आज या अद्वितीय कार्यक्रमाला उपस्थित राहून मी स्वतःला भाग्यवान समजतो. गीतरामायणाची सादरीकरण आणि राम-सीता स्वयंवराचे नाट्य सादरीकरण इतके भव्य आणि सुंदर झाले की प्रत्येक प्रेक्षक भावविव्हल झाला. ही एक अशी सांस्कृतिक गोष्ट आहे जी आपल्या परंपरेला जिवंत ठेवते, आणि यासाठी मी ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉ. मिहीर कुलकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.

viara ad
viara ad

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष, ग्रॅव्हिटी ग्रुप,) यांनी सांगितले, या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आपली संस्कृती आणि परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर यांसारख्या सादरीकरणांमुळे आपण आपल्या मूळांशी जोडलेले राहतो. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि सकारात्मक अभिप्राय यामुळे सिद्ध होते की आजही प्रभू श्रीरामांविषयी आपल्यामध्ये अढळ श्रद्धा आणि प्रेम आहे. आम्ही भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करत राहू, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांनाही या गौरवशाली परंपरेची प्रेरणा मिळेल

कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार स्व. श्री सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि ग. दि. माडगूळकर यांनी रचित “सखी गीतरामायण” ची अद्वितीय सादरीकरण झाले. या संगीतमय अनुभवाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय केले. त्यानंतर झालेल्या “राम-सीता स्वयंवर” च्या नाट्य सादरीकरणात भगवान श्रीरामांचे गुणगान आणि जनकपुरात झालेल्या स्वयंवराची भव्य झलक सादर करण्यात आली. देखणा मंच, संगीतमय सादरीकरण आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक श्रीरामभक्तीमध्ये रंगून गेला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"