आमदार अमित गोरखे व त्यांच्या समर्थकांकडून माझ्या जीविताला धोका : मारुती भापकर

पिंपरी – चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन
पिंपरी : विधान परिषद आमदार अमित गोरखे व त्यांच्या समर्थकांकडून अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करुन धमक्या येत आहेत. माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असे निवेदन माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पिंपरी – चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये स्व.तशीष्का प्रशांत भिसे या गर्भवती महिला प्रसूतीसाठी दि.२८/३/२०२५ रोजी गेल्या. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियाकडे डिपॉझिट दहा लाख रु.भरण्याची मागणी केली. यावेळी भिसे परिवारातील लोकांनी अडीच,तीन लाख भरण्याची तयारी दर्शवली. मात्र रुग्णालय व्यवस्थापन या महिलेला योग्य उपचार दिले नाहीत. या सगळ्या गोंधळात साडेतीन ते चार तास त्या ठिकाणी वाया गेले.
पुढे या दुर्दैवी महिलेला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. त्याच ठिकाणी या महिलेने दोन मुलींना जन्म दिला. मात्र रक्तस्राव जास्त झाल्यामुळे त्यांची तब्येत गंभीर बनवली या दुर्दैवी महिलेची निधन झाले.हा गंभीर प्रकार २८/३/२०२५ रोजी घडलेला असताना आमदारांनी या संदर्भात दि ३/४/२०२५ या दिवशी मीडियाशी संवाद साधला.
यावरून काही मीडियाच्या प्रतिनिधींनी दि.३/४/२०२५ रोजी मला प्रतिक्रिया मागितली.त्यावर मी प्रतिक्रिया देताना हा प्रकार २८ तारखेला घडला. त्यावर आमदारांनी ३ तारखेला प्रतिक्रिया व्यक्त केली. ते त्यांच्या गावाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहिले. त्यामुळे या सर्व दुर्दैवी घटनेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्यांचे व्यवस्थापन व असंवेदनशील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शनिवार दि.५/४/२०२५ मला सायंकाळी ६.०० वाजेपासून विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या समर्थकाकडून मोबाईल कॉल येत असून, ते अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत आहेत. ते धमक्या देत आहे. ते जाहीर माफी मागा नाहीतर परिणामाला सामोरे जा अशा धमक्या देत आहेत. यूट्यूब चैनल लावलेल्या बातम्या व माझा मोबाईल नंबर आमदारांच्या लोकांनी बीड पंढरपूर यवतमाळ आदी भागातील त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून ते मला धमकी देत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्या योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
विधानपरिषद आमदार अमित गोरेखे व त्यांच्या समर्थकाकडून माझ्या व माझ्या परिवाराला धोका निर्माण झाला आहे. माझ्या जीविताला काही झाले. तर याची सर्वस्वी जबाबदारी आमदार अमित गोरखे व मला आज सायं.६.०० वाजेपासून फोन करणारे असतील याची गंभीरपणे नोंद घ्यावीअसे आवाहन भापकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन याना देखील निवेदना द्वारे केले आहे.