फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

जागरुक करदात्यांनी भरला तब्बल ९६६ कोंटीचा मालमत्ताकर !

जागरुक करदात्यांनी भरला तब्बल ९६६ कोंटीचा मालमत्ताकर !

ऑनलाइन स्वरुपामध्ये कर भरण्यास करदात्यांची पसंती; महानगरपालिकेकडून करदात्यांचे आभार
पिंपरी : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ९६६ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. तब्बल ६ लाख ३० हजार २९४ मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ०२ हजार ०२८ व ९२ हजार ४६५ नव्या आकारणी झालेल्या मालमत्तांधारकांमधून ६० हजार ७२ मालमत्तांनी ९८ कोटींचा कराचा जागरुकपणे भरणा केला असून त्यांचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी करसंकलन विभागाने विविध कार्यपध्दती अंवलबविली असून यामध्ये सर्वप्रथम बिगरनिवासी, औद्योगिक व मिश्र मालमत्तांना जप्तीची पूर्वसुचना देऊन ज्या थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केला अशा मालमत्ता सर्वप्रथम सील करण्यात येऊन त्यांची लिलाव प्रक्रियेची नोटीस सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली. त्यामधील जवळपास ४३४ मालमत्ता अंतिम लिलावाच्या उंबरठ्यावर असून त्यांचा निश्चितपणे माहे एप्रिल व माहे मे २०२५ मध्ये लिलाव करण्यात येणार आहे. त्यासोबतच शहरातील
थकबाकी असणाऱ्या रहिवाशी मालमत्तांचे नळ जोडणी खंडीत करुन त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची कारवाई व सदनिकाधारकांच्या शेअरसर्टिफिकेटवर थकीत रकमेचा बोजा चढविण्याचीकारवाई करण्याच्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात आला. सोबतच, थकीत बिगरनिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र मालमत्तांच्या एकूण १०७२ मालमत्तांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात आली.

याबरोबरच रील्स स्पर्धा, टेलिकॉलिंग, एसएमएस यासारख्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्यासोबतच शहरामध्ये होर्डिंग, रिक्षाद्वारे, सार्वजनिक ठिकाणी अनांऊसमेंट, पाम्प्लेट व समाजमाध्यमांद्वारे जनजागृतीच्या माध्यमातून करसंकलन विभाग करदात्यांपर्यंत पोहोचल्याने चालूवर्षी ९६६ कोटींचा कर वसूल करण्यात यश आले आहे. करसंकलन विभागाने घेतलेल्या सर्व पुढाकारांमुळे मोठ्याप्रमाणात करवसूली करण्यास कर आकारणी व कर संकलन विभागाला सातत्य राखता आले आहे. असे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी स्पष्ट केले.

viara ad
viara ad

मालमत्ताकर भरणाऱ्या मालमत्तांची मालमत्ताप्रकारानुसार आकडेवारी !
मालमत्ता संख्या रक्कम कोटींमध्ये ; निवासी – 579, बिगरनिवासी – 227.39, औद्योगिक – 54 , मिश्र – 71.79, मोकळ्या जमीन – 33.41, इतर -0.11: एकूण – 965.7

नागरिकांची ‘ऑनलाइन’ स्वरुपात कर भरण्यास पसंती !
भरणा प्रकार रक्कम कोटींमध्ये ;
ऑनलाईन- 577.70 ,धनादेशाद्वारे – 142.84, रोख – 108.98, अवैध शास्ती समायोजन- 35.95, आरटीजीएस – 44.92, बीबीपीएस – 22.47, एनईएफटी – 19.58, डीडी – 6.69, इडीसी – 3.35,
समायोजन – 2.56, IMPS 0.66, एकूण 965.70

करसंकलनाच्या ठळक बाबी
 ४० टक्क्यांची थकबाकी वसुली
 चालू करामध्ये ८६ टक्क्यांची वसुली
 तब्बल १०७२ इतक्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई
 जवळपास ३ लाखाहून अधिक मालमत्ताधारक मालमत्ताकर भरण्यामध्ये झाले नियमित
 पहिल्यांदाच मालमत्ताधारकांच्या सातबारा व सदनिकाधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर थकीत
कराचा बोजा
 थकीत रहिवाशी मालमत्ताधारकाची यादी प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष/सचिवाला दिली.
 ३ लाखाहून अधिक मालमत्ताधारकांनी घेतला ३१ कोटींच्या

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"