गुढी पाडवा शोभा यात्रेत हजारो हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग!

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शोभायात्रेचे आयोजन
पिंपरी :छत्रपती शिवाजी महाराज की जय !, जय श्रीराम !, प्रभू श्रीराम चंद्र की जय !, भारत माता की जय ! अशा घोषणा.. भगवे झेंडे, डोक्यात परिधान केलेल्या भगव्या टोप्या आणि नागरिकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह अशा भारलेल्या वातावरणात मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा पार पडली. त्यात विशेष आकर्षण ठरले महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक. शोभा यात्रेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग घेतला. मोटारसायकलसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
भाजपाचे प्रखर हिंदूत्वववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्यानिमित्त ही शोभायात्रा पार पडली. रविवारी (दि.३०) मोशी येथील वूड्स विले सोसायटी पासून सकाळी 7 वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. शिवरस्ता ते स्वराज रेसिडेन्सी चौक या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ झाली. शोभा यात्रेमध्ये महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक तसेच महिलांचा मर्दानी खेळ मुख्य आकर्षण ठरले.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय !, जय श्रीराम !, प्रभू श्रीराम चंद्र की जय !, भारत माता की जय ! अशा घोषणा देत शोभायात्रा निश्चित करण्यात आलेल्या मार्गाने मार्गस्थ होत होती. ठिकठिकाणी शोभा यात्रेत प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सिता मातेची वेशभूषा धारण करून चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला. शोभा यात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात शोभा यात्रा पार पडली.

शोभा यात्रेला सकाळी दहाच्या दरम्यान सुरुवात झाली. सर्व दुचाकी वाहनांना भगवे ध्वज लावण्यात आले होते. प्रत्येकाने डोक्यावर भगवा फेटा तसेच भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच पारंपारिक वेषभूषा केली होती. लहान मुले, महिला, युवक, तरुण व ज्येष्ठ नागरिकही या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
हिंदू व भारतीय सणांची वैभवशाली परंपरा
भारतीय पारंपरिक सणांना मागील काही वर्षांपासून आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. हिंदू व भारतीय सणांची वैभवशाली परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व नव्या पिढीला समजावे यासाठी मागील काही वर्षांपासून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रेचे आयोजन करत आहे. आज या शोभा यात्रेमध्ये महिला भगिनींचा प्रतिसाद वाढलेला दिसून आला. युवा वर्ग स्वयंस्फूर्तीने शोभायात्रेत सहभागी झाले होते. आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपली पाहिजे.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड,