फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

आंद्रा धरणावर जलउपसा केंद्रासाठी जागेची प्रतीक्षा!

आंद्रा धरणावर जलउपसा केंद्रासाठी जागेची प्रतीक्षा!

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
पिंपरी : आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस अशुद्ध जलउपसा केंद्र, ॲप्रोच चॅनेल पंप हाउस, ॲप्रोच ब्रीज व सबस्टेशन इ. बांधणेकामी पुणे पाठबंधारे विभागाची जागा मिळावी, त्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व त्या अनुशंगाने शहरासाठी वाढलेली पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यातील 2031 पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहित धरुन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासनाने आंद्रा धरणातून 36.870 द.ल.घ.मी पाणी कोटा आरक्षित केला आहे. त्यास अनुसरुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पुणे पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत मौजे गट नं. 38, मौजे शिरे, ता. मावळ, जि. पुणे या जागेत अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यासाठी मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस आंद्रा धरणातून अशुद्ध जल उपासा केंद्र, ॲप्रोच चॅनेल, पंप हाउस, ॲप्रोच ब्रीज व सबस्टेशन इ. बांधणेसाठी पुणे पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत धरणाच्या वरच्या बाजुला गट. नं. 38, मौजे शिरे, ता. मावळ, जि. पुणे मधील आवश्यक ती जमीन कायमस्वरुपी देण्यात यावी, अशा मागणीचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात निकडीची बाब म्हणून जागा मागणीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली.

अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी कायमस्वरुपी जागा मिळावी
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आंद्रा व भामा आसखेड धरणातून 267 एलएलडी पाणी आरक्षीत केले होते. त्यामधील भामा आसखेडमधून 100 एमएलडी पाणी शहरात दाखल झाले. भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांना सदर पाण्याचा पुरवठा सुरू आहे. आता उर्वरित आंद्रा धरणातील पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. धरणातून अशुद्ध जलउपसा करण्यासाठी केंद्र उभारण्याकरिता कायमस्वरुपी जागा मिळावी, असा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्या अनुशंगाने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्याला यश मिळेल, असा विश्वास आहे.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"