फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

हिंजवडी ट्रॅव्हल बसला आग, चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू!

हिंजवडी ट्रॅव्हल बसला आग, चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू!

व्योमा ग्राफिक्स कंपनीचे सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार
हिंजवडी: पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये ट्रॅव्हल बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे चौघे ही कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.

मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे–सुभाष भोसले, वय 42, -शंकर शिंदे, वय 60, -गुरुदास लोकरे, वय 40, -राजू चव्हाण, वय 40, सर्व राहणार पुणे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना सर्कल वरून रिजवान च्या दिशेने जाणाऱ्या बस ने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यांमधून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"