फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

अन्ऩनलिका बदलाची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया !

अन्ऩनलिका बदलाची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया !

वाय. सी. एम. रुग्णालयात १५ तास शस्त्रक्रिया करुन दिले जीवदान
पिंपरी : पिंपरी येथील वाय.सी.एम रुग्णालय आपल्या कार्यप्रणाली मुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. या पैकी त्याचाच एक उत्कृष्ट़ उदाहरण म्हणजे, वाय.सी.एम मधील शल्य़चिकीत्सा (Surgery) विभागाने केलेली, अन्ऩनलिका बदलाची दुर्बिणीद्वारे केलेली यशस्वी शस्त्रक्रिया होय.

ही अदांजे ४० से.मी. लांबीची मासपेशीने बनलेली अन्ऩनळी असते. जी अन्ऩप्रवाहाचे काम करते. शरीराच्या वेगवेगळ्या भागातुन (छाती आणि पोट) तीचा प्रवाह असतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्त़वाहीनी आणि श्वासनलीका हे अन्ऩनलिकेला चिकटून असतात. त्यामुळेच या ठिकाणी शस्त्रक्रीया करणे अवघड असते. वाय.सी.एम रुग्णालयात १५तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे एका रुग्णाला नवीन जीवनदान देण्यात आले. तब्बल ०१वर्ष अन्ऩनलिकेशी संबंधित गंभीर त्रासाने ग्रस्त असलेल्या या रुग्णाची ही
शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती, परंतु ती यशस्वी ठरली.

संबधित रुग्णाला एका अपघाता दरम्यान फिनॉल विषबाधा झाली होती. या विषबाधेमुळे अन्ऩनलिकेचे इसोफॅगस (आणिश्व़सननलिकेचे) ट्रॅकिया गंभीररीत्या नुकसान झाले होते. यामुळे रुग्णाला तातडीने ट्रॅकिऑस्टॉमी करावी लागली होती. मात्र दीर्घकाळ ट्रॅकिओस्टॉमीमुळे श्व़सननलिकेची जखम आणखी वाढली होती. फिनॉल विषबाधेमुळे अन्ऩनलिकेच्या आतील संरचनेला मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यामुळे अन्ऩनलिकेत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे अन्ऩग्रहण जवळजवळ अशक्य़ झाले होते. रुग्णावर वारंवार एडोस्कोपिक डायलटेशन करावे लागत होती. ज्यामुळे अन्ऩनलिकेच्या फाटण्याचा, रक्त़स्ताव व मृत्यूचा मोठा धोका होता.

या शिवाय उपचारांच्या पुनरावृत्तीमुळे रुग्णाला शारीरिक वेदनांचा सामना करावा लागत होता. सततच्या वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णाला नोकरीवर जाणे शक्य़ होत नव्हते. ज्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण पडला होता. रुग्णांच्या शरिरातील पोषाणतत्वांच्या कमतरतेमुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती, आणि त्याला सतत जिवाणु संक्रमण होण्याचा धोका वाढत होता. अल्प़ पोषाणतत्व़ांमुळे त्याचे दिर्घकालीन आरोग्य़ ही प्रभावित झाले होती. सतत आजारी असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती ही ताणतणावाची होती. रुग्ण्‍ हा एक प्रकारे कुटूंबावर आर्थिक व भावनिक ओझं बनला होता.

रुग्णांच्या गंभीर परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय होता. ही अत्य़ंत गुतागुंतीची शस्त्रक्रिया रुग्णालयातील तज्ञ डॉक्ट़रांच्या टिमने यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष थोरात, डॉ. आनंद झिंगाडे सहयोगी ,प्राध्यापक, डॉ. दिपक पाटील सहयोगी प्राध्यापक, डॉ. अक्षय म्हसे सहाय्य़क प्राध्यापक, डॉ. ईश्व़र पाटील सहाय्य़क प्राध्यापक , डॉ.स्व़प्निल पाटील , डॉ. हर्षवर्धन रोकडे , डॉ. ईशा भुजबळ, डॉ. नरेश एस.ए आणि टीमने व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक सर्जरी (VATS) आणि दुर्बिनीच्या सहाय्याने (Laparoscopy Surgery) सर्जरीच्या माध्य़मातून अन्ऩनलिका जठरापासून नव्याने तयार केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"