फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

हुल्लडबाज बुलेटस्वारांना मिळाला चोप

हुल्लडबाज बुलेटस्वारांना मिळाला चोप

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : निगडी, प्राधिकरण परिसरात बुलेटवरून फिरत स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी चोप दिला आणि शालेय परिसरातील शांतता भंग न करण्याची समज दिली.

निगडी- प्राधिकरण परिसरात अनेक तरूण बुलेटवर बसून स्टंट करतात. हुल्लडबाजी करतात. यामुळे शाळेच्या परिसरात ध्वनिप्रदूषण होतेच शिवाय शांतता भंग होते. मनसे शहर प्रमुख सचिन चिखले, माजी नगरसेवक उत्तम केंदळे आणि सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप हे प्रभाग कार्यालयात कामानिमित्त चालले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावरून काही महाविद्यालयीन युवक बुलेट दामटत आणि फट फट असा आवाज काढत हुल्लडबाजी करत असल्याचे आढळून आले. याबाबत या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तक्रार केली. स्टंटबाजी करणाऱ्यांचा पाठलाग केला. त्यांना पकडून समज दिली.

यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी शाळा, शिवभूमी शाळा, मॉर्डन हायस्कूल, एसपीएम शाळा या परिसरात बेफाम बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओंचा त्रास होतो. त्यामुळे शालेय परिसरात बुलेट घोंगावत फिरतात. कानठळ्या बसविणारे आवाज असतात. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

उपद्रवी टोळक्यांची माहिती देण्याचे आवाहन
ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र केली जाणार आहे. जर अशाच प्रकारच्या धिंगाण्याची पुनरावृत्ती झाली, तर त्याचा थेट परिणाम होईल. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहावे, आणि अशा उपद्रवी टोळक्यांची माहिती आम्हाला द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

हुलडबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार

  • शाळा सुटताना मुलींना मुद्दामपणे त्रास देणे
  • वृद्ध नागरिकांना विनाकारण हैराण करणे
  • रस्त्यावर स्टंट करत उगाचच शो ऑफ करणे
  • सिगारेट ओढून परिसर अस्वच्छ करणे
  • अश्लील वर्तन करणे.

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पकडून सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर या प्रकारची माहिती निगडी पोलीस स्टेशनला दिली असून, लवकरच या भागात पोलीस बंदोबस्त अधिक कडक केला जाणार आहे. कुणीही या रस्त्यांवर दहशत माजवू नये, नागरिकांनो, हा लढा आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, सतर्क राहा, आणि कुठेही गैरप्रकार दिसल्यास आम्हाला तत्काळ कळवा, असे आवाहन मनसेचे शहरात शहरप्रमुख सचिन चिखले यांनी केले आहे.

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची गरज आहे. शहराच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत, धिंगाण्याची पुनरावृत्ती झाली, तर त्यांना वठणीवर आणले जाईल, अशी माहिती माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"