सातासमुद्रापार खो-खो होतोय लोकप्रिय

युवा खेळाडूंचे योगदान मोलाचे; जेन साँडर्स आणि अन्या शाह यांच्या प्रयत्नांचे कौतुक
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : भारताच्या मातीत खेळला जाणारा पारंपरिक खो – खो हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी आणि तो सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यासाठी इंग्लंडमधील भारतीय वंशाचे खेळाडू जेन साँडर्स आणि अन्या शाह हे दोघे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
खेळात फक्त पदक जिंकण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा भारतीय वंशज म्हणून असलेली नाळ घट्ट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जेन साँडर्स आणि अन्या शाह हे दोघे इंग्लंडच्या ३० सदस्यीय संघाचा भाग आहेत. ते इंग्लंडत्या टीमसोबत खो-खो वर्ल्ड कपसाठी भारतात आले आहेत. त्यांना विश्वास आहे की इंग्लंडमध्ये आता खो-खो या खेळासाठी एक मजबूत स्पर्धात्मक संरचना तयार झाली आहे. ही टीम आता भारतातील प्रसिद्ध खेळाशी स्पर्धा करू शकते.
जेन हा १६ वर्षांचा आहे, त्याने अॅथलेटिक्समधून खो-खो खेळात पाऊल ठेवले. तो यशस्वी २०० मीटर धावपटू असून, त्याने U17 राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक मिळवला होता.
(संदर्भ – पीटीआय)