फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयासाठी ९ लाख रुपयांचे पांढरे उंदीर!

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयासाठी ९ लाख रुपयांचे पांढरे उंदीर!

पिंपरी : संभाजीनगर आकुर्डी येथील संत बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय गेली ७ वर्षापासून पर्यटकांसांठी नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली बंद असून अजून पुढील वर्षभर पर्यटकांसांठी ते खुले होण्याची शक्यता नाही. संत बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ५० ते ६० पक्षी, २ मगर आणि वेगवेगळ्या १३ जातीचे ५३ विषारी आणि बिनविषारी साप सांभाळले आहेत. सापांचे खाद्य उंदीर असल्याने या १३ जातीच्या सापांसाठी दोन वर्षासाठी ५,४०० पांढरे उंदीर विकत घेण्यासाठी महापालिका पशुवैद्यकीय विभागातर्फे ९ लाख रुपयांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

विविध जातीच्या ५३ सापांना महिन्यासाठी २२५ उंदीर खाद्य आवश्यक असून एका पांढऱ्या उंदिराची अंदाजे किंमत १६० ते १७० रुपये अपेक्षित असून ७ ते २१ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.

संत बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय हे संभाजीनगर येथे महापालिकेने उभारले असून २४ कोटी रुपये खर्च करून या प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम गेली ७ वर्षापासून सुरू असल्याने पर्यटकांना या ठिकाणी जाता येत नाही.या संग्रहालयात पर्यटकांना जाण्यासाठी आणखी किमान एक वर्ष तरी थांबावे लागणार आहे.
प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद असले तरी संग्रहालयातील साप आणि प्राणी यांची देखभाल करणे आवश्यक असल्याने सापासाठी ९,०७,२०० रुपयांचे पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती महापालिका उपायुक्त आणि पशू वैद्यकीय अधिकारी संदीप खोत यांनी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"