नामदेव लांडे यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी लांडेवाडी येथील वारकरी संप्रदायातील नामदेव सोनबा लांडे-पाटील (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे ते चुलते आणि क प्रभागाचे माजी स्वीकृत सदस्य विजय लांडे यांचे ते वडील होत.