युगल मुनिराज यांची भोंडवेंच्या कार्यालयास सदिच्छा भेट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : जैन समाजातील युगल मुनीराज जी प पू १०८ श्री अमोघकीर्तिजी आणि प पू १०८ अमरकीर्तिजी महाराज यांनी मोरेश्वर भोंडवे यांच्या भोंडवे कॉर्नर आठवडी बाजार येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. श्री भोंडवे तसेच सर्व रावेत येथील उपस्थित भक्तगण यांना आशीर्वाद दिले. श्री. भोंडवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराज जी यांचे पाद्य पूजन मोठ्या भक्ती भावाने केले.
युगल मुनिराज जी यांचा विहार मुंबईकडे होत होता, याची कल्पना श्री मोरेश्वर भोंडवे यांना मिळाली होती. त्यांनी श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर ट्रस्टी यांना महाराज जी यांचे आशिर्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली व तसे निवेदन महाराजजींना दिले. युगल मुनीराजजी यांनी आपल्या विहार मार्गात आमच्या नूतन कार्यालयास पदपर्श करून आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती भोंडवे यांनी केली. त्यानुसार मुनींचा विहार संत तुकाराम पुलाजवळ आला असता श्री मोरेश्वर भोंडवे जी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह महाराज जी यांचे स्वागत केले व महाराज जी यांना आपल्या नूतन कार्यालयात घेऊन गेले.
संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावनभूमीत साधू संताना नेहमीच उच्च स्थान भक्तगणानी दिलेले आहे आणि त्याच धर्तीवर श्री. मोरेश्वर भोंडवे करत असलेले सामाजिक तसेच धार्मिक कार्य सर्व मानव जातीसाठी प्रेरणा दायी आहे. असेच सामाजिक तसेच धार्मिक कार्य आपल्या हातून व्हावे असे उद्गगार महाराज जी यांनी काढले व श्री मोरेश्वर जी व सर्व भक्तगणाना आशीर्वाद देण्यात आले, त्यानंतर महाराज जी यांचा विहार पुढे किवळे कडे चालू झाला.
यावेळी श्री. मोरेश्वर भोंडवेजी ,श्री. भंडारीजी ,श्री हरिभाऊ जाधव, डॉक्टर माधुरी फडे,जी तसेच श्री अजितजी पाटील, श्री विरेन जैन, श्री प्रकाश शेडबाळे, श्री सुदिन खोत,श्री. शांतीनाथ पाटील,श्री उमेश पाटील, श्री.विद्याधर हुंडेकर, श्री विनोद वठारे,श्री नेमीचंद पाटील, श्री सुरगोंड पाटील,श्री अमोल शिरगावे ,श्री बाहुबली बसन्नावर,श्री सचिन हुपरे,श्री सुनील खोत,श्रीमती शशिकला बसन्नावर, सौ स्नेहल बसन्नावर, पार्श्व पद्मवती महिला मंडळ तसेच मोठ्या प्रमाणात श्रावक, श्राविका उपस्थित होते.रावेत येथील महिला मंडळाने संयोजनासाठी सहकार्य केले.