पिंपरी चिंचवड शहरांतील वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरीक, खाजगी बांधकाम व्यवसायिक, विविध ठेकेदार, कारखनदार, दुकानदार तसेच सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना सुचित करणेत येते की, पिंपरी चिचवड शहरात वर उल्लेख केलेल्या पर्यावरणास हानीकारक कोणत्याही कृती करणेत येऊ नये. अन्यथा, मनपाने निश्चित केलेल्या धोरणांनुसार नियुक्त केलेल्या स्वतंत्र एजन्सीमार्फत नियमाधिन कारवाई करणेत येणार आहे, याची सक्त नोंद घ्यावी असो आवाहन महापालिका आयुक्त शेखरसिह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वाढणारे प्रदूषण व त्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना व मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक १८/०९/२०२४ रोजीच्या आदेशान्वये (Gyaded Respone Action Plan) तयार केला असुन अंमलबजावणी सुरु करणेत आलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात ठेवणे व नागरीकांच्या उत्तम आरोग्य पुरविणेकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष प्रयत्न करीत आहे. त्यानुसार शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६, बांधकाम राडारोडा व्यवस्थापन अधिनियम २०१६, प्लॅस्टीक अधिनियम २०१६, जैववैद्यकीय घनकचरा अधिनियम, पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६ इ. नुसार शाहरातील सावर्जनिक ठिकाणांवर निगराणी ठेवणेत येणार आहे. त्याकरीता मनपामार्फत स्वतंत्र एजन्सीची नेमणुक करणेत आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये स्थानिक नागरिकांकडून तसेच अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेने नदी नाले यांच्या काठावर अनाधिकृतपणे भराव व बांधकाम राडा टाकण्यात टाकण्यासह घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, रस्ते-पदपथावर घान करणे, चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम नियंत्रण नियमावलींचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा समारंभ संपल्यावर साफसफाई न करणे, मनपा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे, व्यावसायिक आस्थापनेमार्फत कचरापेटी न ठेवणे, जैव वैद्यकीय घनकचरा सामान्य कचऱ्यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, कचरा जाळणे, बंदी असलेले प्लास्टिकचा वापर करणे, मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छता ठेवणे, डास उत्पत्ती स्थानाची निर्मिती करणे तसेच लहान उद्योजक कारखानदार मार्फत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे नदीमध्ये सोडणे इत्यादींमुळे मनपा परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे इत्यादींवर बंधन आणून आळा घालणेकामी संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करणेत येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.