फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

मावळातील सहारा वृद्धाश्रमाला पुस्तके भेट

मावळातील सहारा वृद्धाश्रमाला पुस्तके भेट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या कुसवली गाव (मावळ) येथील सहारा वृद्धाश्रमास पुस्तक प्रेमी जगन्नाथ नेरकर यांनी आज २ हजार ग्रंथांची भेट दिली.

आंदर मावळातील दुर्गम भागात असलेल्या या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना वाचन करण्यासाठी आता विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक ॲड लक्ष्मण रानवडे, प्रदीप बोरसे आदी यावेळी उपस्थित होते. संचालक विजय जगताप, विष्णू मांजरे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. धार्मिक, ऐतिहासिक, मनोरंजनात्मक तसेच कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य आदींचा या ग्रंथांमध्ये समावेश आहे. या अनोख्या ग्रंथ भेटीमुळे आजी आजोबांनी समाधान व्यक्त केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"