फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा : ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा : ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

चिंचवड : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते.

या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले.

या समारंभाचे उद्घाटन सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि., कोम्पोजिट डिव्हिजन चे सीनियर जनरल मॅनेजर-ऑपरेशन्स हेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या, क्वालिटी सर्कल च्या संचालिका डॉ.रजनी इंदुलकर, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल आणि विजया रुमाले उपस्थित होत्या.

हनुमंत टिकटे, मनीष फाले, प्रभु झुंजा, प्रशांत मुधलवाडकर, प्रवीण हाके, श्रीधर राव आणि विठ्ठल वाकचौरे यांनी केस स्टडीचे मूल्यमापन केले. घोषवाक्य आणि पोस्टरचे मूल्यमापन धनंजय वाघोलीकर आणि परविन तरफदार यांनी केले. पवनकुमार रौंदळ आणि प्रभू झुंजा यांनी गुणवत्तेवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली व या स्पर्धेत टाटा ऑटोकॉम्प – इंटिरियर प्लास्टिक डिव्हिजन यांनी स्पर्धा जिंकली.समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे राहुल वैद्य – मॅक्सियन व्हील्स इंडिया प्रा.लि.- व्यवस्थापकीय संचालक यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार क्वालिटी सर्कल चे कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर यांनी केला.

प्रमुख पाहुणे राहुल वैद्य आणि क्वालिटी सर्कल पुणे चॅप्टर कौन्सिलचे सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल, धनंजय वाघोलीकर, परविन तरफदार आणि पवनकुमार रौंदळ यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजक आणि रौप्य स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रहीम मिर्झा बेग , प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"