फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

मतमोजणीसाठी उद्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय भागातील वाहतुकीत बदल!

मतमोजणीसाठी उद्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय भागातील वाहतुकीत बदल!

पिंपरी :-विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवारी (दि.२३) होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे. पिंपरी आणि भोसरी या मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुलात, चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी थेरगाव येथे, तर मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव येथे होणार आहे. त्यासाठी वाकड, हिंजवडी आणि तळेगाव परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
चिंचवड मतदारसंघातील मतमोजणीसाठी वाकड विभागांतर्गत वाहतूक बदल केला आहे. मावळच्या मतमोजणीसाठी तळेगाव, तर पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत वाहतूक बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त बांगर यांनी केले आहे.

वाकड विभागांतर्गत असा असेल बदल..

  • तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने काळेवाडी रस्त्याने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • काळेवाडी पोलिस ठाणे येथून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. या मार्गावरील वाहने काळेवाडी पोलिस ठाणे येथून उजवीकडे वळून पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या रस्त्याने इच्छित स्थळी जातील,
  • तापकीर चौक ते तापकीर मळा या दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत भाजप महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील.
    हिंजवडी विभागांतर्गत असा असणार बदल..
  • गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल हा रस्ता जड व अवजड वाहनांसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून चांदेनांदे येथून येणारी जड- अवजड वाहने गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण व हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील. बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड- अवजड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील.
  • बालेवाडी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता उत्तम स्वीट (पुणेरी स्वीट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातून येणारी हलकी वाहने उत्तम स्वीट (पुणेरी स्वीट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकीपासून पुढे मुख्य रस्त्याने राधा चौक येथून इच्छित स्थळी जातील, तसेच दुसरा पर्यायी मार्ग म्हणून राधा चौकातून येणारी वाहने म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ डावीकडे वळून पुढे (पुणेरी स्वीट) जवळ डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, गोदरेज सर्कल चौक येथूनजातील.
  • महाविकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी राधा हॉटेलच्या मोकळ्या जागेमध्ये व न्याती शोरूम ते पॅरादी हवेली अंडरपास दरम्यानच्या सेवा रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच म्हाळुंगे पोलिस चौकी ते बालेवाडी स्टेडियम प्रवेशद्वारच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांची व्यवस्था आहे.

तळेगाव विभागांतर्गत असा असणार बदल..

  • मुंबईकडून तळेगाव चाकण
    रस्त्याने एचपी चौकाकडे जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी. या मार्गावरील वाहने वडगाव फाटा एमआयडीसी रस्तामार्गे वडगाव कमान (डावीकडे वळून) तळेगाव नवलाख उंब्रे बधलवाडी भामचंद्र डोंगर आंबेठाण एचपी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
  • मुंबईकडून चाकणच्या दिशेने
    जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी महाविद्यालयापर्यंतच्या मार्गावर बंदी. या मार्गावरील वाहने वडगाव फाटा निलया सोसायटी कार्नर (डावीकडे वळून) मंत्रा सिटी रस्तामार्गे बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून) सीटी कार्नर (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळून चाकण बाजूकडे जातील. काका हलवाई स्वीट मार्ट / शांताई जनसेवा वाचनालय इंद्रायणी महाविद्यालय चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहतुकीस चाकण तळेगाव रस्त्यावर बंदी आहे. या मार्गावरील वाहने एचपी चौक आंबेठाण भामचंद्र डोंगर नवलाख उंब्रेमार्गे जातील,
  • बधलवाडी चाकणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव ते वडगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर बंदी. या मार्गावरील वाहने जनसेवा वाचनालय इंद्रायणी महाविद्यालय येथे (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग शांताई सीटी कार्नर (उजवीकडे वळून) बीएसएनएल कॉर्नर (डावीकडे वळून) मंत्रासिटी रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"