पोलिसांची छापेमारी; कारवाईत ३ लाखांची दारू जप्त

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करून बेकादेशीर रित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दिघी, आळंदी, दापोडी आणि निगडी येथून सुमारे तीन लाख रुपयांची दारू जप्त केली.
याबाबत पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली. दिघी पोलिस ठाण्यात सुशांत दीपक भोसले (२२), धनंजय आकाश दुनगाव (२९, दोघे रा. दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांकडून पाच हजार ९८० रुपये यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. आळंदी पोलिस ठाण्यात रोहित आदित्य पाटील (२०, रा. पिंपरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताकडून ६५ हजार ५३५ रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दापोडी पोलिस ठाण्यात विश्वजीत नितीश मिरिदा (२५, रा. कासारवाडी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताकडून दुचाकी आणि विदेशी दारू असा एकूण ४८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित विश्वजीत हा बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करताना आढळून आला.
निगडी पोलिस ठाण्यात दीपक कैलास पांडे (३५, रा. निगडी), राहुल शिवाजी ठावरे (३३, रा. चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.