फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

सर्वकष सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी!

सर्वकष सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांच्या सर्वकष सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी केली आहे. आता सोसायटी अध्यक्षांकडे थकबाकीदारांची यादी पाठविली जाणार आहे. मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्वरित मालमत्ता कराचा भरणा करण्याचे करसंकलन विभागाचे आवाहन केले आहे.

मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या मालमत्तांमध्ये ६९० सोसायट्यांमधील ५६,२३२ मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल बजाविणेत आले असून यामधून ६५१ सोसायटीमधील ३६९८० मालमत्ताधारकांचा ६९.५६ कोटींचा कर थकीत आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना एसएमएस, टेलिकॉलिंग यामाध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार करसंकलन विभागाकडून करण्यात येत आहे.

शहरातील थकबाकी असणाऱ्या ६५१ सोसायटींचे अध्यक्ष तथा चेअरमन यांना त्यांच्या सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमतांधारकांची संपूर्ण माहिती उदा. थकीत मालमत्ताधारकाचे नाव, थकीत रक्कम इ. करसंकलन विभागाकडून पाठविण्यात येणार असून, थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी सोसायटीच्या नोटीस बोर्ड, सोसायटी व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठवून, तसेच ज्यांची कराची थकीत रक्कम आहे ; अशा सोसायटीच्या सभासदांना कराचा भरणा करण्यासाठी त्यांनी आवाहन करावे असे करसंकलन विभागाकडून सोसायटी अध्यक्षांना कळविण्यात आले आहे.

नव्याने आकारणी झालेल्या सोसायट्यामधील मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी वारंवार विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू अ‌द्यापही कराचा भरणा न केलेल्या सोसायट्‌यांमधील मालमत्तांची यादी संबंधित सोसायटी अध्यक्षांना पाठविण्यात येणार असून, सोसायटी अध्यक्षांनी सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना तात्काळ कराचा भरणा करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"