बॅटरीचा स्फोट होऊन 35 ते 40 इलेक्ट्रिक दुचाकी जळाल्या!

पिंपरी : वाकड पोलीस ठाणेच्या हद्दीत बजाज कंपनीच्या इथर इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्विसिंग सेंटर मधील दुचाकींना आग लागल्याने 35 ते 40 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत . दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बॅटरीचा स्फोट झाल्याने सर्विसिंग सेंटर मधील 35 ते 40 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या आहे . पत्र्याच्या शेडमध्ये हे सर्विसिंग सेंटर होते ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने आगीचे कारण काय आहे याबाबत तपास केला जात आहे . घटनास्थळी रात्री उशिरा अग्निशामक दलाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या . रात्री उशिरा घटनास्थळी वाकड पोलीस दाखल झाले . या इलेक्ट्रिक दुचाकी सर्विसिंग साठी सेंटरमध्ये आणल्या गेल्या होत्या .

