फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेच्या सेवेतून अधिकारी, कर्मचारी असे ३२ जण सेवानिवृत्त!

पिंपरी चिंचवड पालिकेच्या सेवेतून अधिकारी, कर्मचारी असे ३२ जण सेवानिवृत्त!

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर सेवानिवृत
पिंपरी : महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांनी सातत्य,सचोटी व जबाबदारीने केलेल्या सेवेमुळे महानगरपालिका वेगाने मार्गक्रमण करीत असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे माहे ऑगस्ट २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ९ अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांचा उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, संगणक अधिकारी वैभवी गोडसे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका महासंघाचे नंदकुमार इंदलकर, माया वाकडे तसेच विविध विभागातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे जुलै २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, उप अभियंता मोहन खोंद्रे कार्यालय अधीक्षक साधना ढमाले, पांडुरंग मोरे , गट निर्देशक मनोज ढेरंगे, सिस्टर इनचार्ज शारदा भोर, संगीता कदम, लघुलेखक प्रशांत काळेगोरे, भांडारपाल अनय म्हसे, क्रीडा शिक्षक विजय लोंढे, ए. एन.एम. वंदना गोपकर, सुरक्षा सुपरवायझर शंकर आरोळकर, लिपिक शंकर कानडी, वायरमन संजय पांढरकर, रखवालदार मधुकर भारती, शिपाई सुनिता फाले, मुकुंद गुरव, मजूर गणपती नाईक, आया रोहिणी सोन्नयल्लू, विशाखा जाधव, गटर कुली चंद्रकांत जगताप, सफाई कामगार आशा जगताप यांचा समावेश होता.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य निरीक्षक संजय गेंगजे, सफाई कामगार गेनबहादूर खत्री, मैनाबाई सोनवणे, सोजर शिंदे, सफाई सेवक शेषराव वाकोडे, अन्वर गागडे, कचरा कुली संजू घोलप, मुकादम अनिल तापकीर, सफाई कामगार पोपट चव्हाण यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"