उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाला ३२ लाखांची मदत!

देहू : संत तुकाराम महाराजांचे अंकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. त्यात त्यांनी सुसाईड नोट लिहीत कुणाला किती पैसे देणे बाकी आहेत, याचा उल्लेख केला होता. आता सांवेदनशील नेते म्हणून परिचित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी मोरे कुटुंबाला ३२ लाख रुपये मदत केली आहे. शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून आमदार विजय शिवतारे यांनी ही मदत काल पोहचवली आहे. शिवतारे यांनी ही मदत मोरे कुटुंबियांकडे सुपूर्त केली आहे. आत्महत्या कारण्याअगोदर मोरे महाराजांनी माझे कर्ज फेडण्यासाठी मित्रांनी माझ्या घराच्याना मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यांच्याच आवाहनाला साद दिली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आर्थिक अडचणीत शिरीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं, ही बाब एकनाथ शिंदेंना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आल्याचे बघायला मिळत आहे.
या सर्वांचं होतं कर्ज?
शिरीष महाराजांवर ३२ लाख ३५ हजारांचे कर्ज होते. मुंबईतल्या सिंघवजींचे १७ लाखाचे, बचत गटाचे ४ लाखांचे, सोने गहाण ठेवलेले त्याचे १ लाख ३० हजार, वैयक्तिक कर्ज २ लाख २५ हजार, चारचाकी वाहन ७ लाखाचे कर्ज आणि किरकोळ देणी ८० हजार असे एकूण ३२ लाख ३५ हजारांचे कर्ज होते.