पिंपरी चिंचवड महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर 318 हरकती !

हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी प्रधान सचिव प्रवीण दराडे प्राधिकृत अधिकारी
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 318 हरकती दाखल झाल्या असून हरकती सूचना दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 276 हरकती दाखल झाल्या. सर्वात जास्त हरकती सूचना प्रभाग क्रमांक दहा मोरवाडी- शाहूनगर- संभाजीनगर या प्रभागातून आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत बदल करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मतभेद आहेत. भारतीय जनता पक्षाने प्रारूप रचनेत बदल करू नये अशी मागणी केली तर राष्ट्रवादी काँग्रेस ने बदलासाठी आग्रह धरला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने 22 ऑगस्ट ला चार सदस्य पद्धतीने 32 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली . प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले तसेच महापालिका भावनातील वाहन तळामध्ये माहितीसाठी लावण्यात आले .आहेत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना देण्यासाठी गुरुवार 4 सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची राज्य शासनाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे . पाच ते 12 सप्टेंबर दरम्यान हरकती वर सुनावणी घेतली जाणार आहे .त्यानंतर प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होईल अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण निश्चिती होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रारू प प्रभाग रचने संदर्भात 44 हरकती नोंदवण्यात आले असून त्यांची सुनावणी उद्या 5 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत होणार आहे यासाठी राज्य शासनाने