फक्त मुद्द्याचं!

31st May 2025
मुंबई

2652 लाडक्या बहिणींनी पैसे लाटले !

2652 लाडक्या बहिणींनी पैसे लाटले !

सरकारी महिला कर्मचारी असल्याचे तपासात निष्पन्न
मुंबई: गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना गेल्या जुलै महिन्यात सुरू केली. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे 59 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, असता 2652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. सरकारी कार्यालयामध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन गले लठ्ठपगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही .

पैशाच्या मोहापाई लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा प्रकार उघड झाला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली आणि महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्यास सुरुवात केली .आता 2100 रुपये कधी मिळतील यासाठी महिला आग्रही आहेत. गरीब महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही योजना असताना अनेक महिलांनी पैशाचा हावरटपणा करून योजनेचा लाभ घेतला आहे, आणि राज्य सरकारची फसवणूक केली आहे.

viarasmall
viarasmall

माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा यूआयडी डेटा उपलब्ध करून दिला सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवलेली होती त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. त्यात 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असल्याचे निदर्शनास आले .त्यांनी अॅागस्ट2024 पासून एप्रिल 2025 म्हणजे नऊ महिन्यात प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले असे निष्पन्न झाले आहे .याचा अर्थ 3 कोटी 58 लाखांची कमाई या महिलांनी केली .

याच पार्श्वभूमीवर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते ,तरी ही अनेक महिला कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला. वर्ग तीन आणि वर्ग चार च्या महिला कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे ज्या 2652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनवून पैसे उचलले .त्यांच्याकडून आता या रकमेची वसुली करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला त्याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"