पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 23 कर्मचारी सेवानिवृत्त

पिंपरी : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य व्यवस्थित नियोजन करून व्यतीत करावे, कुटुंबियांना वेळ द्यावा,पर्यटन तसेच आवडते छंद जोपासावेत,आपले निरोगी आयुष्य महत्वाचे असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी वक्त करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिपावली निमित तसेच त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठीशुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑक्टोबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६ अश्या एकूण २३ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशिला जोशी, कर्मचारी महासंघाचे नथा मातेरे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे ऑक्टोबर २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता दत्तात्रय रामगुडे, कार्यालय अधिक्षक लिंबाजी गभाले, मुख्य आरोग्य निरीक्षक सतिश पाटील,मुख्याध्यापिका सुनिता जमदाडे, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे, सुरक्षा निरीक्षक ज्ञानदेव भांडवलकर, मुख्य लिपिक नितीन कदम, उपशिक्षक
विद्यादेवी ठुबे, उदयभान मिश्रा, जनरेटर ऑपरेटर विजय पाटील, इले. मोटार पंप ऑपरेटर रामाशंकर प्रसाद, वॉर्डबॉय सदानंद साबळे, मजूर अशोक नाणेकर, सुरेश कदम, सुनंदा तिकोणे, सफाई सेवक कुमार बनसोडे, मुकादम अशोक सुदाम रणदिवे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई सेवक उज्वला कांबळे, राजाराम उरणकर, कल्याणी अष्टगे, सुरेश सोळंकी, गटरकुली आनंद मोरे, अनिल गायकवाड यांचा समावेश आहे.
आज सेवानिवृती होणाऱ्या कर्मचार्यांनी निवृत्तीपूर्वी “आम्ही, भारताचे नागरिक,लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” आशी शपथ घेऊन मतदानाचा निर्धार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.