औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या फुटबॉल स्पर्धेत ११ कंपन्यांचा सहभाग!

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या फुटबॉल स्पर्धेचा आरंभ मंगळवार २३ डिसेंबर रोजी टाटा मोटर्सच्या फुटबॉल क्रीडांगणावर झाला. या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स ए, टाटा मोटर्स बी, बजाज ऑटो वाळूज,एसकेएफ,ॲटलास कॉपको, टीटीआयएल, सँडविक एशिया, थरमॅक्स, अम्युनिशन फॅक्टरी, फॉर्विया, टीकेआयएल वगैरे ११ कंपन्यांच्या संघानी भाग घेतला आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन टाटा मोटर्स युनियन स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन शशिकांत कात्रे व औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना शशिकांत कात्रे म्हणाले की फुटबॉल खेळाची आवड शारीरिक संपदा मजबूत करण्याबरोबर मानसिक ताकद मिळविण्यास याचा फायदा होतो. यावेळी नरेंद्र कदम यांनी सर्व पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, खजिनदार प्रदीप वाघ ,सहखाजिनदार विजय हिंगे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,नितीन कदम(टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी),आर्यन ट्रॉफीचे अमित कदम,शशिकांत कात्रे(टाटा मोटर्स युनियन स्पोर्ट्स समिती चेअरमन), सुनील रसाळ(माजी युनियन प्रतिनिधी),विजय सुतार,अशोक पाटील हेही उपस्थित होते.या स्पर्धेचे आयोजनासाठी सायमन डिगामा, नरेश जाधव, नरी जगन्नाथन, अरुल फर्नांडिस हे रेफ्री म्हणून काम पाहत आहेत. सदर स्पर्धा सिग्मा इलेक्ट्रिकल मॅन्युफॅकचरिंग यांनी पुरस्कृत केलेली आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत ठोंबरे यांनी केले.
या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१) टीटीआयएल विरुद्ध फॉर्विया यात झालेल्या सामन्यांमध्ये टीटीआयएल टायब्रेकर मध्ये ८-७ गोलने विजयी झाली.टीटीआयएल कडून आयुष चक्रवर्ती,अर्णब कुमार, प्रणव मारवाह, आदित्य सारुळकर, दिब्या घोष तर फोर्विया कडून शिवम नागटिळक, प्रतीक धामे, निरंजन भोसले व श्रेयस गुरव यांनी गोल केले.
२) दुसऱ्या सामन्यात अम्युनिशन फॅक्टरी विरुद्ध थरमॅक्स यांत झालेल्या सामन्यात अम्युनिशन फॅक्टरी ५-४ गोलने विजयी झाली.अम्युनिशन फॅक्टरी कडून मेलविन अँथनी, नोएल फर्नांडिस, सुकांता मधु, आशिष गलांडे, मारण लक्ष्मीय्या तर थरमॅक्स कडून रोहन देसुरकर, संकुल पुणसे, श्रेयस कळसकर, उत्कर्ष पाटील यांनी गोल केले.
३) बजाज ऑटो वाळूज विरुद्ध टीकेआयएल यात झालेल्या सामन्यांमध्ये टीकेआयएल २-१ गोलने विजयी झाली.टीकेआयएलच्या मोहित बेनाडीकरने २ गोल व अभिषेक विभुते १ गोल यांनी तर बजाज ऑटो वाळूज कडून संतोष पाटील यांनी १ गोल केले.
४) ॲटलास कॉपको विरुद्ध एसकेएफ यात झालेल्या सामन्यांमध्ये यात झालेल्या सामन्यांमध्ये ॲटलास कॉपको २- ० गोलाने विजयी झाली. ॲटलास कॉपको कडून टॉम वर्गीसने दोन्ही गोल केले.

