फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

भोसरी विधानसभा : १० जणांनी घेतले अर्ज

भोसरी विधानसभा : १० जणांनी घेतले अर्ज

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी कोणाला मिळणार याकडे एकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष असताना राजकीय पक्षातील वेगाने घडणाऱ्या घडामोडींची परिणती आता उमेदवार यादीतून दिसू लागली आहे. अनेक मतदार संघांसाठी उमेदवार अर्ज घेऊन जाऊ लागले आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघासाठी आजच्या दिवशी १० जणांनी अर्ज नेले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात २२ ऑक्टोबर २०२४ पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.

२०७ – भोसरी विधानसभा संघ मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे –
१)हिरामण बाबू बाबर (अपक्ष) ,
२)श्री राहुल अंकुश लांडगे(अपक्ष),
३)श्री रविलक्ष्मण लांडगे (अपक्ष),
४)श्री अमित रमेश मोहिते (अपक्ष ),
५)श्री सोमनाथ तुकाराम शेळके(अपक्ष),
६)श्री अमजद मेहबूब खान (अपक्ष),
७)श्री मिथुन धनंजय गजरे (अपक्ष),
९)श्री अरुण मारुती पवार(अपक्ष),
९)विश्वास भगवान गजरमल (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस),
१०)श्री बाबासाहेब सरवदे (अपक्ष)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"