फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या वतीने सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. नम्रता भांगरे, वैदेही कणसे, अक्षता सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्मार्ट सिटीच्या सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास पद्मश्री गिरीश प्रभुणे, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. स्पर्धेमध्ये ४ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये पहिल्या फेरीत १७०० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. तन्वी किरण लवटे या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली. तिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. फॅशन डिझायनर शुभांगी भोईटे, विशाखा शेरे, आणि रिलायन्स प्रतिनिधी सुचित्रा झणकार या परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. आशिष चिकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पौर्णिमा भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

इयत्ता १ली ते ४थी गट
प्रथम क्रमांक- वैदेही कणसे (ज्ञानदीप विद्या मंदिर),
द्वितीय क्रमांक- चारवी चालखोर (मॉडर्न प्राथमिक स्कूल यमुनानगर निगडी),
तृतीय क्रमांक- अनघा जगताप (जय हिंद प्राथमिक शाळा),
उत्तेजनार्थ – सौम्या परचंडे (इंदिरा नॅशनल स्कूल),
तन्मय कांबळे (निगडी मुले मुली क्र.2/2),
सान्वी हिरेमठ (मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल),
लक्षण्या अटवाल (ज्ञान प्रबोधिनी नव नगर विद्यालय, निगडी),

इयत्ता ५वी ते ७वी गट
प्रथम क्रमांक- अक्षता सुर्यवंशी (रिव्हरडेल शाळा इंद्रायणीनगर भोसरी पुणे)
द्वितीय क्रमांक- राधिका आगरे (पिंपरी चिंचवड महानगर पालिका पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक 54)
तृतीय क्रमांक- हिमांशू देसले (मॉडर्न हायस्कूल, निगडी, पुणे44),
उत्तेजनार्थ – जान्हवी मुजमुले (न्यू इंग्लिश स्कूल, भोसरी),
प्रतिक पाटेकर (ॲपेक्स इंटरनॅशनल स्कूल),
वेदांत देवकर(जय हिंद हायस्कूल),

इयत्ता ८वी ते १०वी गट
प्रथम क्रमांक- नम्रता भांगरे(अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय),
द्वितीय क्रमांक- अंजित दिनेश इंगळे (माध्यमिक शाळा थेरगाव),
तृतीय क्रमांक- धनंजय भीमराव सावंत (अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)
उत्तेजनार्थ-विघ्नेश रामचंद्र जाधव (विश्वकर्मा विद्यालय)
तन्वी विवेक मानकरी (एसव्हीव्हीएन)
सायोम कृष्ण डोळस (अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"