विनेश फोगटच्या कामगिरी नंतर भाजपा ट्रोल?

पॅरिस : मागचे वर्षभर महिला कुस्तीपटूंच्या न्यायासाठी भारतात रस्त्यावर उतरलेली ती आज कुस्तीच्या मैदानात एका योद्ध्यासाठी लढली, असा उल्लेख करीत भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा आज (६ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्तीच्या सामन्यात गौरवाने उल्लेख केला गेला. विनेशने उपान्त्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
भारतीय कस्तीपटू अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेली विनेश फोगाट हिने देशाची मान आज आणखी उंचावली. वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या युयी सुसाकी यांना शेवटच्या दहा सेंकदात विनेश फोगाट यांनी थेट अस्मान दाखवले. ५० किलो वजन गटातून विनेश फोगाट कुस्तीच्या मैदानात उतरल्या. पहिला विनेश यांनी युयी सुसाकी यांना चित्तपट केले नंतर क्वार्टर फायनलमध्ये ओक्साना लिवाच यांना पराभूत करत थेट सेमीफायनल मध्ये धडक दिले. विनेश फोगाट यांच्या दणदणीत खेळीनंतर भारतातून त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. विनेशने भारतासाठी पदकाच्या आशा पुन्हा जिवंत केल्या आहेत.
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मागील एक वर्ष विनेश फोगाट आंदोलन करत होत्या पण यानंतर बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी रान उठवले होते अशातच आता विनेश फोगाट यांच्या दमदार खेळीनंतर नेटीझन्स कडून विनेश फोगाट यांच्यावर स्तुती सुमने उधळली जात आहेत. विनेश फोगाट सध्या भारतात ट्रेडिंगवर दिसू लागले आहे.
भारताच्या विनेश फोगटने उपांत्यपूर्व लढतीत दमदार कामगिरी केली आणि ५० किलो कुस्तीच्या फ्री स्टाइल गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या ओसाका लिवाचचे यावेळी विनेशपुढे आव्हान होते. विनेशने हा सामना ७-५ असा जिंकला आणि तिने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे आता जर विनेशने उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर तिला सुवर्णपदक पटकावता येऊ शकते. त्यामुळे आता उपांत्य फेरीत विनेश कशी कामगिरी करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
2 Comments
To the point chya sarvach Batmayan che selection khupch chan mahatvpurn aani akarshak aahet.
Watchali sathi Khup khup Shubheccha.
SAMPURN TEAM CHE ABHINANDAN 👍
To the point chya sarvach Batmayan che selection khupch chan mahatvpurn aani akarshak aahet.
Watchali sathi Khup khup Shubheccha.
SAMPURN TEAM CHE ABHINANDAN 👍