फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र राजकारण

विकासनिधीवरुन पवार, महाजनात वाद

विकासनिधीवरुन पवार, महाजनात वाद

मुंबई : विकासनिधीच्या वाटपावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या दोन दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धामुळे कॅबिनेटमधील अन्य सदस्यही अचंबित झाले. आपल्या ग्रामविकास खात्यासाठी अधिक निधी देण्यात यावा, अशी मागणी महाजन यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी आता पैसे कुठून आणू. राज्यातील जमिनी विकून पैसे आणू का?, अशा शब्दांत अजित पवार यांनी महाजन यांना सुनावले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली.

यानंतर गिरीश महाजन यांनीही अजित पवारांना जशास तसे उत्तर दिले. अजित पवार यांच्या पक्षातील एका आमदाराच्या नाशिकमधील सिन्नर येथील मतदारसंघात एका स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या तरतुदीचा मुद्दा महाजन यांनी मांडला. पैसे नाहीत म्हणून नको तिथे खर्च करायला नको, ही तुमची भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळे एकीकडे कोंडीत सापडलेल्या अजित पवार यांना आणखीन घेरण्याचा प्रयत्न महाजन यांनी केला. िवशेना शंदे गटाचे आमदार अजिर पवार निधी देत नाहीत अशी तक्रार करीत महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

बच्चू कडू यांनी याआधी आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"