फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

लोणावळ्यात २४ तासात तब्बल २७५ मिमी पाऊस

लोणावळ्यात २४ तासात तब्बल २७५ मिमी पाऊस

लोणावळा : शहरामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाचे नोंद आज झाली आहे. २४ तासात शहरात तब्बल २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली या दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील

या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. छोटे मोठे नाले हे ओसंडून वाहत असून इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे.

लोणावळा शहरामध्ये गुरुवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या रात्री देखील वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत २६०१ मिमी (१०२ इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज पर्यंत २५०३ मिमी (९८.५४ इंच) पाऊस नोंदवण्यात आला होता. आज देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"