फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी शहर

महिलेची 23 लाखांची फसवणूक

महिलेची 23 लाखांची फसवणूक

पिंपरी – तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून महिलेची 23 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पुण्यातील बाणेर सूस रस्ता येथे घडला.

बाणेर येथील 38 वर्षीय महिलेने याप्रकरणी शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकधारक, बँक खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडीक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून कंपनीचा हेड रिप्रेझेन्टीव्ह बोलत असल्याचे त्याने भासवले. तुमचे मुंबई ते इराण असे कुरिअर जात आहे. त्या औषधाच्या कुरिअरमध्ये एका औषधामध्ये ड्रग्ज आहे. ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवले असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल असे सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"