फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये हर घर तिरंगा

पिंपरी-चिंचवडमध्ये हर घर तिरंगा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवावा, तसेच महापालिकेच्या हरित सेतू उपक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृतीसाठी आकुर्डी येथे सायकल रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, सुनील पवार, गजानन खैरे उपस्थित होते. उपक्रमात पाचशेहून अधिक सायकलपटूंनी भाग घेतला.

‘आम्ही आपला तिरंगा ध्वज आमच्या घरांवर फडकवू तसेच स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करू आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी स्वत:ला समर्पित करू” अशी शपथ सहभागी व्यक्तींनी घेतली.

घरोघरी तिरंगा मोहीमेंतर्गत पालिकेच्या वतीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा स्वाक्षरी मोहीम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीला सुद्धा तिरंगामधील रंगांनी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

रॅलीचा प्रारंभ जेष्ठ नागरिक रवींद्र होनराव यांनी झेंडा दाखवल्यानंतर करण्यात आला. आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृह रॅली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोरून संजय काळे ग्रेड सेपरेटर, नॅशनल सुपर मार्केट, म्हाळसाकांत चौक, लोकमान्य हॉस्पिटल, फ क्षेत्रीय कार्यालय, काचघर चौक, भेळ चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, अप्पूघर चौक, धर्मराज उड्डाणपूल, आकुर्डी रेल्वे स्टेशनमार्गे परत आली. माझी वसुंधरा पर्यावरण रक्षणाची सामुहिक शपथही घेण्यात आली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"