फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

परवाना नसलेल्या कॅफेवर कारवाई

परवाना नसलेल्या कॅफेवर कारवाई

पिंपरी, प्रतिनिधी : परवानगी नसताना कॅफे चालवून तिथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या रावेत येथील नॉकनॉक कॅफेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दहा जुलै) करण्यात आली.

कुणाल पांडुरंग राळे (वय २१, रा.भोसरी) याच्या विरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्याकडे कॅफे चालवण्याचा कोणताही परवाना नसताना तो नॉक-नॉक कॅफे चालवत होता. त्यामध्ये बाहेरच्या बाजूने पडदे लावून तेथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे सुरु होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"