दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरीमधील रिव्हर रोड येथे चार जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (२९ जुलै) रात्री दहा वाजता घडली.
यश नरेश अग्रवाल (वय २१), नरेश उर्फ निलेश अग्रवाल (वय ४२) राज विजय अहिर (वय २२), पवन ललित टमाटा (वय २१, सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनश कमलेश परब (वय ३१, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हातात कोयते घेऊन फिर्यादी दिनेश परब यांना तसेच आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ केली. परब यांच्या घरात घुसून घरातील सामानची तोडफोड केली. परब यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
…..