क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून महानगरपालिकेच्या उपक्रमांची पाहणी!

पिंपरी : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुब्रतो घोष, एच. बी. चावला, जयेश यादव या अधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली आणि कामकाजाची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे संगणकीय सादरीकरण आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमोर सादर केले. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट शासकीय कार्यालयातील विविध उपक्रमांची गुणवत्ता तपासणे आणि त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करणे हे असून ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करते.

महापालिका प्रशासकीय भवनाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
महानगरपालिकेची गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील चारही मजल्यांवर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अभिलेख, स्वछता गृह, नागरिक बैठक व्यवस्था,नागरी सुविधा केंद्र,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, माहिती फलक, जिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी लावलेले चित्रे, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या सुविधाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली, तसेच प्रत्येक विभागाला भेटी देत अभिलेख मांडणी देखील पाहिली. यावेळी स्थापत्य विभागातील लवभागातीि झाडांच्या कुंड्यांची सजावट पाहून समाधान व्यक्त केले.