फक्त मुद्द्याचं!

15th April 2025
आरोग्य लाईफस्टाईल

उपाशी पोटी हे पाच मसाले टाळा!

उपाशी पोटी हे पाच मसाले टाळा!

मसाले आपल्या जेवणाची लज्जत वाढवतात. काही मसाले सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी सेवन केले जातात. कारण वजन कमी करण्यासाठी या मसाल्यांचा उपयोग होतो. पण दूरगामी परिणाम म्हटले तर यामुळं पोट बिघडतं आणि पचनसंस्था सुद्धा बिघडते. तसंच आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं रिकाम्या पोटी हे मसाले खाऊ नयेत.

भारतात गरम मसाले आपल्या जेवणाची चव वाढवतात. प्रत्येक मसाला हा पदार्थात जसा आवश्यक आहे, तसा त्यात औषधी गुणही आहे. पण काही मसाले आपल्याला अनशापोटी खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतात. ते कोणते? हे जाणून घेऊ या. रिकाम्या पोटी मसाले खाल्ले गेले तर पित्त वाढू शकतं. यातून गॅस आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास वाढू शकतो. इतकंच नाही तर मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. असे कोणते पाच मसाले आहेत, जे रिकाम्या पोटी खाल्ले तर पोटाचे विकार होऊ शकतात, हे जाणून घेऊ.

ओवा
पोटाच्या समस्यांवर ओवा गुणकारी आहे. तसंच संधिवात, पुरळ, हिरड्यांची सूज, सर्दी-खोकला यासारखे अनेक रोग ओवा दूर करतो. वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ओवा हा एक गरम मसाला असल्यामुळं याचं अतिसेवन टाळावं. विशेषत्वाने उन्हाळ्यात उपाशी पोटी ओवा खाल्ला तर छातीत जळजळ होते.कधीही घरगुती उपाय म्हणून ओवा खायचा असेल तर आधी थोडासा खाऊन बघावा, त्याचा नक्की चांगला परिणाम होतो आहे का, हे पाहून मग तो सेवन करावा.

काळी मिरी
पचनासाठी काळीमिरी खूप चांगली असते. पदार्थाचा स्वादही वाढवते. पचनासंबंधी त्रासही दूर करते. सर्दी-खोकल्यावर तर गुणकारी आहेच. एक्स्फोलिएशनवर सुद्धा चांगला उपाय आहे. पण जर उपाशी पोटी काळी मिरी खाल्ली गेली तर काही औषधं आपल्या शरीरावर परिणाम करू शकत नहीत. त्याचा आतड्यावरही परिणाम होतो.

मेथी दाणे
वजन कमी करणं, त्वचा आणि केसांचा पोत सुधारणं किंवा त्या समस्या सोडवणं अशा घरगुती उपायांसाठी मेथी दाणे उपयुक्त आहेत. अनेकजण पोट साफ होण्यासाठी आणि वजनाशी निगडित समस्यांसाठी मेथी दाणे वापरतात. श्वसनाचा काही त्रास होत असेल तर मात्र मेथी दाणे खाऊ नयेत.

लाल शिमला मिरची
कोरड्या लाल शिमला मिरचीची पावडर म्हणजे पेप्रिका. तांदळापासून तयार केला जाणारा कोणताही पदार्थ असेल तर त्यात पेप्रिकाचा वापर होतो. पण पोट रिकामं असताना हा मसाला खाऊ नये. पोटात जळजळ होऊ शकते. सॅलडमधल्या चवीसाठी शिमला मिरची ऐवजी लिंबू पिळता येईल.

दालचिनी
भारतातल्या प्रत्येक घरात दालचिनी आढळेल. स्वयंपाकात तिचा वापर केला की, लज्जत वाढेल. दालचिनीचा स्वाद आणि औषधी गुणांमुळे स्वयंपाका व्यतिरिक्त चहामध्ये सुद्धा दालचिनीचा वापर होतो. त्याप्रमाणेच दालचिनीचा वापर जास्त झाला तर त्याचा परिणाम यकृतावर होऊ शकतो. तसंच अतिवापरामुळं चेहऱ्यावर अलर्जी, तोंड येणं, चेहऱ्यावर पांढरे डाग येणं हा त्रास होऊ शकतो.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"