आमचे टार्गेट कोण हे लवकरच कळेल

प्रतिनिधी, पिंपरी: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला आहे. माझी बदनामी केली जात आहे, असा दावा मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पिंपरीत केला आहे.
‘आमचे टार्गेट कोण आहे हे आम्ही लवकरच सांगू. तोपर्यंत मी काहीच नाही बोलणार. मलाही आता थोडे थोडे राजकारण समजू लागले आहे.’ असे जरांगे पाटील म्हणाले. पुणे न्यायालयात एका दाव्यासंदर्भात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे हजर शुक्रवारी हजर होणार असल्याने गुरुवारी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. दरम्यान जरांगे पाटील यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांसह पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेतला.
विधानसभा निवडणूक लढविणार कि नाही? यावर प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्ही आरक्षणावर ठाम आहोत. पण राजकारणात आम्हाला ढकलले जात आहे. आरक्षणासाठी इतर समाजानेही आम्हांला पाठिंबा दिला आहे. समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायच आहे. यावर निर्णय घेणे बाकी आहे. याचा निर्णय २९ ऑगस्टला होणार आहे. आमचे टार्गेट कोण आहे हे १९ ऑगस्टला सांगू. २९ तारखेपर्यंत मी काहीच नाही बोलणार. थोडे थोडे राजकारण मलाही समजु लागले आहे.’