नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या कार्यालयात रविवारी पहाटे गोंधळ आणि तोडफोड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. डीयूएसयूचे अध्यक्ष तुषार देधा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) तर उपाध्यक्ष अभि दहिया हे एनएसयूआयचे आहेत. दुसरीकडे अभाविपने या घटनेनंतर कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दिल्ली पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली. अभाविप आणि एनएसयूआयच्या सदस्यांमध्ये कार्यालयात खडाजंगी झाली. कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणालाही दुखापत झाली नाही. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आमच्याकडे दोन्हीकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या गार्डचा जबाब नोंदवला असून, निवेदनाच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही बाजूंशीही संपर्क साधला जाणार आहे.
संघटनांचे परस्परांवर आरोप
एनएसयूआयच्या सदस्यांनी दारूच्या नशेत विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात गोंधळ घातल्याचा आरोप अभाविपने केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ऑफिसच्या टेबलाची काच फुटली आहे. तेथे असलेले सामानही विखुरलेले आहे, कार्यालयातील बऱ्याच साहित्याचे नुकसान झालेले आहे. मात्र, यासंदर्भात एनएसयूआयकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.