फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

माझ्याकडे पुरावे आहेत : सचिन वाझे

माझ्याकडे पुरावे आहेत : सचिन वाझे

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, असे त्याने म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला. पण त्या दबावाला भीक न घातल्यानं मला खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं, असे सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले होते. त्या आरोपाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझेंनी देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.

मात्र, अनिल देशमुख गृहमंत्री असताना या प्रकरणआत त्यांनी नेमके काय काय केले, याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत आणि मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे, असं म्हणत वाझे याने खळबळजनक विधान केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"