फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
देश विदेश

ढगफुटीमुळे उत्तराखंडमध्ये १० जणांचा मृत्यू

ढगफुटीमुळे उत्तराखंडमध्ये १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा मार्गावर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. दरड कोसळल्यानं आणि या पवासमुळं १० भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५० जण बेपत्ता आहेत. भीमबली येथे १५० ते २०० यात्रेकरू अडकले असल्याचे सांगितले जाते. दगडी ढिगाऱ्यांमुळे सुमारे ३० मीटर चालण्याच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे.

हरिद्वारमध्ये बुधवारी सायंकाळी थोडा उशिरा मुसळधार पाऊस पडल्यानंतर संपूर्ण शहर जलमय झाले होते. कोरडी नदी पाण्याने भरल्याने कावड घेऊन जाणारी वाहने वाहून गेली. अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. कानखल पोलीस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरले. पावसामुळे भूपतवाला, हरिद्वार, न्यू हरिद्वार, कंखल, ज्वालापूर येथील अनेक वसाहती आणि बाजारपेठांची दुरवस्था झाली असून, सर्वत्र जलमय झाले आहे.

शाळा, अंगणवाडी केंद्र बंद
खराब हवामानामुळे चार धाम यात्रा आजच्या दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.म्हणजेच हरिद्वार आणि ऋषिकेशमधील नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंग नगरमध्ये 31 जुलै रोजी एक दिवसासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. डेहराडून जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार, मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बुधवारी बंद राहतील.

पुढचे ४८ तास महत्त्वाचे
प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 48 तासांत उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हा इशारा मंगळवारी रात्रीपासून लागू झाला आहे. डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"