फक्त मुद्द्याचं!

14th March 2026
गुन्हेगारी

ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार!

ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार!

पिंपरी : दुचाकीवरून कामावर जात असताना पुणे नाशिक हायवे मोशी चौकात अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मयत झाला. ही घटना शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोशी गाव चौक, पुणे -नाशिक हायवे येथे घडली .

viara vcc
viara vcc

भगवान सिद्धार्थ साखरे (वय 29 रा.खी रीड वस्ती, मोशी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद प्रकाश गायकवाड (वय 33, महालक्ष्मीनगर, मोशी, मूळ पत्ता -मु. पो. चांडोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशोक लेलँड ट्रकचा चालक बिलाल असलम बारूदवाले (वय 21, रा. शीलवंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे दाजी भगवान सिद्धार्थ साखरे (वय 29, खिरीड वस्ती, मोशी) हे त्यांचे राहते घर येथून मोशी टोल नाका येथे त्यांच्या दुचाकी स्प्लेंडर गाडी क्रमांक (एम. एच./ 14, एन ए /94 43 वरून कामा निमित्ताने येत असताना मोशी गाव चौकामध्ये पाठीमागून येणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक (एम. एच./16 सी झेड/ 97 87 )याने पाठीमागून दुचाकी स्वराला धडक दिली, ट्रकचालक बिलाल अस्लम बारूदवाले याने ट्रक भरधाव वेगाने चालवून नियमांकडे दुर्लक्ष केले. दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने मयत साखरे हे खाली पडले ट्रकचे चाक त्यांचे पोटावरून गेल्यामुळे त्यांच्या पोटातील आतडे बाहेर येऊन ते गंभीर जखमी होऊन मयत झाले .भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"